top of page
Post: Blog2_Post
Search

सर्वांचा जन्मदाता एकच आहे

विचारांच्या निर्भीड व निरहंकारी संत पीटर यांनी विरोधकांची यत्किंचितही पर्वा न करता स्पष्ट म्हटले की- “ईश्वर कोणत्या एका जातीचा पक्ष घेत नसतो, तर ज्या कोणत्या जाती किंवा जो कोणी मनुष्य त्याला भितो, त्यावर विश्वास व आस्था ठेवतो, ते सर्व त्याला प्रिय असतात आणि अशाच जाती अथवा मनुष्यास सद्धर्माचा उपदेश दिला जाऊ शकतो, जो त्यास प्राप्त करण्यास सर्वस्वी अधिकारी आहे.

असंतुष्टांना न भिता पीटरने धर्मसभेमध्ये उत्तर दिले, “बंधूंनो! मी जगातील सर्व जातींना उत्पन्न करणाऱ्या एकाच ईश्वरास मानतो. म्हणून माझ्या दृष्टीने कोणतीच जात अपवित्र नाही. एखाद्या जातीचे रीती-रिवाज भिन्न प्रकारचे आहेत, म्हणून ती जात ईश्वरीय उपदेशासाठी अपात्र ठरत नाही. पवित्र आत्म्याची छाया त्यांच्यावर देखील तशीच पडते, जशी तुम्हा आम्हावर पडते. "


अखण्ड ज्योती (मराठी)

ऑक्टोबर 2009


 
 
 

Recent Posts

See All
आमचा युग - निर्माण सत् संकल्प

मी आस्तिकता आणि कर्तव्यनिष्ठता हे मानवी जीवनाचे धार्मिक कर्तव्य मानतो. शरीराला देवाचे मंदिर मानून मी आत्मसंयम आणि नियमिततेने माझ्या...

 
 
 

Comentários


©2020 by DIYA (Youth wing of AWGP). 

bottom of page