top of page
Post: Blog2_Post
Search

सदुपयोग न होऊ शकण्याची विडंबना

प्रगतीच्या नावाखाली जे प्राप्त झाले होते, त्याचा सदुपयोग चांगल्या कार्यासाठी, सार्वजनिक हितार्थ केल्या गेला असता तर, आज जग किती सुंदर, सुखी, संपन्न व उन्नत झाले असते, याची कल्पना सहजच येऊ शकते, परंतु दुर्दैव तर बघा, की त्याने समंजस व शहाणे म्हणविल्या जाणाऱ्यांना स्वार्थाच्या साखळदंडांनी करकचून बांधून टाकले आहे व जे हाती लागले त्याचा दुरुपयोग करण्यासाठीच प्रवृत्त केले आहे. त्याचे परिणाम समोर दिसतातच. गरीब असो की श्रीमंत, हे सर्वच साधनांच्या बाबतीत असंतुष्ट आहेत व कुबेरा प्रमाणे वैभवशाली बनू इच्छितात. मिळून मिसळून सर्वांनी समान उपभोग घेण्याची कोणाचीच इच्छा नाही. एक दुसऱ्याचे शोषण-दोहन करण्यासाठीच आतुर, निरंतर चिंतातुर, असंतुष्ट, उद्विग्र आणि व्याकूळ बनून जगताहेत. वरपांगी डामडौल पाहून प्रगतीचा भ्रम तर होतो, परंतु वस्तुत: मनुष्य आपले शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक आरोग्य पूर्ण पणे गमावून बसला आहे. स्मशानातील भूत पिशाच्चांप्रमाणे शंकाग्रस्त होत व बेचैन करणाऱ्या काळजीत भीत-भीत जीवन कसेबसे जगतो आहे. हे समस्त समस्यांचे जाळे केवळ भ्रांती व असामंजास्यावर उभे आहे. योग्य विचार करण्याची आणि चांगले जीवन जगण्याची कला समजून घेऊन आत्मसात केली असती, तर आज जगात सर्वत्र प्रगती, आनंद व सुख शांतीचे वातावरणच राहिले असते. स्नेह, सौजन्य, सद्भाव व सहयोगाच्या वातावरणात प्रत्येकाला उल्हास व आनंदाचाच अनुभव झाला असता.


पुस्तक-एकविसाव्या शतकातील गंगावतरण

लेखक- पं श्रीराम शर्मा आचार्य


 
 
 

Recent Posts

See All
आमचा युग - निर्माण सत् संकल्प

मी आस्तिकता आणि कर्तव्यनिष्ठता हे मानवी जीवनाचे धार्मिक कर्तव्य मानतो. शरीराला देवाचे मंदिर मानून मी आत्मसंयम आणि नियमिततेने माझ्या...

 
 
 

Comments


©2020 by DIYA (Youth wing of AWGP). 

bottom of page