संवेदना
- Akhand Jyoti Magazine
- Jul 6, 2021
- 1 min read
साबरमती आश्रमात जेवणाची वेळ संपून गेली होती. त्यानंतर काही अतिथी आले. त्यात पं. मोतीलाल नेहरू देखील होते. पुन्हा अन्न शिजविण्याची गरज पडली. कस्तूरबा त्या वेळी थकून थोड्या लेटल्या होत्या. त्यांचे डोळे लागले होते. आश्रमात एक त्रावणकोरवरून आलेला मुलगा काम करीत होता. कुसुम नावाची एक मुलगी सुद्धा जेवण बनविण्याचे काम करीत असे. गांधीजींनी या दोन मुलांना म्हटले तुम्ही दोघे मिळून काय शिजवायचे तेवढे बघा. ते दोघे कामाला लागले. थोड्या वेळाने जेवणाची व्यवस्था झाली. एवढ्यात कस्तूरबांना जाग आली. ते पाहताच त्यांना दुःख झाले. त्या म्हणाल्या, "मला का नाही उठवलेत? या मुलांना सुद्धा आराम करण्याची गरज होती. " पति-पत्नीच्या याच परदुःखाविषयीच्या संवेदनेमुळे, सेवेच्या बाबतीत त्यांच्या उत्कट निष्ठेमुळेच त्यांना विश्ववंद्य बनण्याचा मान मिळाला.
मे 2009
अखण्ड ज्योती (मराठी)
Comments