top of page
Post: Blog2_Post

वैराग्याची पूर्व तयारी कशाला ?


एक स्त्री आपल्या माहेरी जाऊन नुकतीच परत आली होती. ती आपल्या पतीला सांगू लागली “माझा भाऊ तर आता विरक्त झाला आहे. त्याला या जगाचा वीट आला आहे. येत्या दिवाळीला तो दीक्षा घेणार आहे. मग तो साधू बनेल. त्याने तर आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. आपल्या संपत्तीची योग्य ती सोय करण्यात व त्याची विल्हेवाट लावण्यात तो गुंतला आहे. " पत्नीचे हे बोलणे ऐकून पती हसू लागला. पत्नी विचारू लागली - " हसायला काय झाले ? यात हसण्यासारखे काय आहे ?" पती म्हणाला, "बाकी तर सर्व काही ठीक आहे. पण तुझ्या या भावाचे हे वैराग्य मला जरा विचित्रच वाटते. दीक्षा घेण्याची तिथी ठरलेली आहे. संपत्तीची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करू लागला आहे, हे काही पटत नाही. त्याग असा नसतो. त्याग तर सहज होऊन जायला पाहिजे. "पत्नीला हे ऐकून वाईट वाटले. ती तोऱ्याने बोलू लागली, "एवढे ज्ञानवंत आहात, एवढा वाद घालता आहात, तर मग स्वतःच का नाही वैराग्य घेऊन दाखवीत तुम्ही ?" पती म्हणाला, "मी तर तुझ्या या सहमतीचीच वाट पाहत होतो. " एवढे बोलून त्याने आपले सगळे कपडे काढून ठेवले. अंगावर फक्त एका धोतराशिवाय काही राहू दिले नाही आणि तडक तो घर सोडून बाहेर पडला. पत्नीला ही थट्टा वाटली. तिने विचार केला, येतील झाले, थोड्या वेळात. जातात कुठे ? पण तो तर परत येण्यासाठी गेला नव्हता. तो गेला तो वैराग्य घेऊनच घराबाहेर पडला होता.


खरे पाहता वैराग्य, जीवनदान, समयदान यासाठी कुठल्या ही मुहूर्ताची वाट बघत राहण्याची गरजच नसते. ती गोष्ट तर सहज होत असते. मनात आले आणि केले, एवढ्या सहज होऊन जाते.


अखण्ड ज्योती (मराठी)

नोंव्हेबर 2010

 
 
 

हाल ही के पोस्ट्स

सभी देखें
सच्चा परोपकार

परोपकार और पुण्य के नाम पर मनुष्य कुछ धार्मिक कर्मकाण्ड, थोड़ा सा दान या कोई ऐसा काम करते हैं जिसे बहुत से लोग देखें और प्रशंसा करें। कई...

 
 
 
पुरुषार्थ की उपासना

जो ये चाहते हैं कि कोई हमारी सहायता करे, हमें जीवन-पथ पर - चलने की दिशा दिखाए; जो सोचते हैं कि कैसे करें ? वे अंधकार में ही निवास करते...

 
 
 

Comments


©2020 by DIYA (Youth wing of AWGP). 

bottom of page