तीन प्रकराचे भक्त
- Akhand Jyoti Magazine
- Aug 30, 2021
- 1 min read
श्रीरामकृष्ण आपल्या शैलीत म्हणतात, “भक्त तीन प्रकारचे असतात. एक भक्त असतो तमोगुणी- असे भक्त आज सर्वत्र मोठ्या संख्येत दिसत असतात. जोराजोराने ओरडतात "जय जय शिवशंकर ! शभ्मो ! बम भोलेनाथ ! ' पण जीवनात कुठेही भगवंत नाही. दुसरा रजोगुणी भक्त असतो. खूप पूजा करतो. अनेक उपचार करतो. दाखवितो सर्वांना. खूप खर्च करतो. पण जीवनात मात्र अध्यात्म नावापुरतेच असतो. सत्त्वगुणी भक्त हा सर्वात उच्च असतो. त्यांच्या बाबत ते म्हणतात, जणू काही मच्छरदाणी लावून कुणी माणूस ध्यान लावून बसला आहे. ते जे काही करतात तीच पूजा असते. ते मोठमोठी कामे करतात. चांगली लोककल्याणाची कामे सतत करतात, पण त्यांची जाहिरात करीत नाहीत. त्याचा दंभ करीत नाहीत. त्याचा त्यांना अहंकार नसतो. अनेक परमार्थाच्या कामात त्यांची भागीदारी असते. पण त्यांना त्याचा अहंकार मुळीच नसतो. आपले नाव व्हावे ही देखील त्यांना इच्छा नसते. ते फक्त प्रभूचे नम्र भक्त बनून राहू इच्छितात. हीच ती अनन्यता, खरी उपासना, दृढताक तत्परता. शरीर कर्म करीत राहील पण मन मात्र योगीच्या रूपात राहील. हीच भगवंताच्या भक्ताची खरी शोभा आहे. हेच त्याचे कर्म त्याला शोभा देत असते. "
अखण्ड ज्योती (मराठी) ऑक्टोबर 2009
Comentarios