top of page
Post: Blog2_Post
Search

गोपाळ कृष्ण गोखले


गोपाळ कृष्ण गोखले हे खऱ्या अर्थाने एक ऋषी होते. मानवाच्या समस्यांचा समग्र विचार करून, स्वतः तपस्व्याचे आयुष्य जगून मानवतेला सुखी बनविण्या साठी जे प्रयत्न करतात त्यांनाच ऋषी म्हणतात. राष्ट्रीय कार्यासाठी त्यांनी देशभर फिरून धन गोळा केले आणि अनेक श्रेष्ठ मानवोपयोगी कार्यासाठी व राष्ट्रीय कार्यासाठी त्याचा उपयोग केला. पण आपल्या स्वतःच्या जीविकेसाठी त्यांनी त्यातला एक पैसा देखील कधी वापरला नाही. त्यांना फर्ग्युसन कॉलेज मधून जी 24 रु. मासिक पेन्शन मिळत होती त्यावरच ते आपले आयुष्य जगत होते. त्यांनी देशासाठी गरिबी स्वीकारली व हे व्रत त्यांनी आयुष्यभर अंगीकारले. खऱ्या ब्राह्मणाप्रमाणे त्यांनी देशसेवेसाठी अहर्निश निष्ठेने सेवाकार्य केले. जनतेच्या भल्यासाठी ते खपले. ते गांधीजींचे गुरू होते. राजकारणात वेळोवेळी ते त्यांचे मार्गदर्शन करीत व योग्य तो सल्ला देत असत. गांधींना प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करण्याआधी संपूर्ण भारताचे भ्रमण करण्याची प्रेरणा गोपाळ कृष्ण गोखले यांनीच दिली होती.


डिसेंबर 2008

अखंड ज्योती


 
 
 

Recent Posts

See All
आमचा युग - निर्माण सत् संकल्प

मी आस्तिकता आणि कर्तव्यनिष्ठता हे मानवी जीवनाचे धार्मिक कर्तव्य मानतो. शरीराला देवाचे मंदिर मानून मी आत्मसंयम आणि नियमिततेने माझ्या...

 
 
 

Comentarios


©2020 by DIYA (Youth wing of AWGP). 

bottom of page