गीतेचे मर्म
- Akhand Jyoti Magazine
- Jul 15, 2021
- 1 min read
रेहाना तैय्यब या मुसलमान असून सुद्धा कृष्णभक्त होत्या. त्या महात्मा गांधींच्या शिष्या होत्या. गांधीजींनी तिला सांगितले, “गीतेमध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे. वाचून बघ." रेहाना तैय्यव | म्हणाली “मला गीता कळत नाही. त्यामुळे वाचण्यात मन लागत नाही.” त्यावर बापूजी म्हणाले | "कळत नसले तरी गीतेचे श्लोक अर्थासहित 100 वेळा वाचून काढ यामध्ये कितीही वेळ लागला तरी चालेल. त्यानंतर मला सांग." गीता वाचण्यात रेहाना इतकी मग्न झाली की तिला 100 वेळा वाचण्याची गरजच पडली नाही. गीतेचे मर्म तिला कळून चुकले होते आणि तिच्या सर्व समस्यांचे समाधान झाले होते. मे 2008 अखण्ड ज्योती (मराठी)
Comments