top of page
Post: Blog2_Post
Search

ऋषिचिंतन उत्थान की पतन हे स्वतःच निवडायचे


मनुष्य प्राणी ही विधात्याची सर्वोत्कृष्ट कृती आहे, निर्मिती आहे. मनुष्याने जर योग्य विचाराची दिशा अंगीकारली तर एवढ्या भांडवलावर तो स्वतःच्या आत्मकल्याणाचा स्वार्थ व लोककल्याणाचा परमार्थ हे दोन्ही उद्देश याच जन्मात साध्य करून घेऊ शकतो. तो एवढा सक्षम, समर्थ व आत्मनिर्भर आहे की आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग केल्यास त्याच्यावर कुणासमोर हात पसरविण्याची वेळ येऊ शकत नाही, एकमेकांशी व्यवहार करणे, देव-घेव करणे, स्नेह सहकार्य यांचे आदान-प्रदान करणे वेगळी गोष्ट आहे पण त्याला कधी दारिद्य व विपन्नावस्थेच्या खाईत जाऊन पडण्याची वेळ येऊ शकणार नाही.



मनुष्याच्या भाग्यात ईश्वराने पतन, पराभव या गोष्टी लिहून ठेवल्याच नाहीत. एवढे असूनही माणसाने स्वतःच वाईट मार्गाचा हट्टाने अवलंब करून आपली दुर्गती स्वतःवर ओढून घेण्यास व त्यांना आमंत्रण देण्यास कसलीच कसर ठेवली नाही.योग्य मार्ग निवडून त्याचा अवलंब करणे व सज्जनतेचा व्यवहार करणे हाच आपला खरा उत्कर्षाचा, उत्थानाचा व विकासाचा आधार आहे. मानवाच्या पतनाचे कारण अनुपयोगी व विकृत चिंतन करणे व त्याच्या आहारी जाऊन वाईट मार्गाचे अनुसरण करणे हा आहे. प्रत्येकासाठी उंच जाण्याचे व खाली पडण्याचे असे दोन्ही मार्ग मोकळे आहेत. यापैकी ज्याला जो मार्ग आवडेल त्याने तो मार्ग अनुसरावा. मनुष्य आपल्या भाग्याची घडण स्वतःच करीत असतो, ही सत्यबाब आहे व याचे सार्थकत्व तो स्वतःच्या उदाहरणाने सत्य व सिद्ध करून दाखवू शकतो.


मानवी जीवनाची सुरुवात सृजनाच्या उत्कृष्ट स्वरूपाकडे जाण्यासाठी व त्यासाठी आवश्यक ती क्षमता स्वतःमध्ये कायम करण्यासाठी झालेली आहे. त्याच्या जवळ वर उंच जाण्याचे तसेच खाली पतनाच्या दिशेने जाण्याचे दोन्ही प्रकारचे सामर्थ्य आहे. त्यापैकी तो कुणाची निवड करतो, कुणाकडे त्याचा ओढा वाढत जातो हे त्याच्यावरच अवलंबून आहे. उत्थानाच्या राजमार्गावर जायचे की पतनाच्या खाईत जाऊन पडायचे व आपले दुर्भाग्य स्वतः वर ओढवनू घ्यायचे हे त्याचे त्यालाच ठरवायचे आहे.


- पं. श्रीराम शर्मा आचार्य


जुलै 2009

 
 
 

Recent Posts

See All
आमचा युग - निर्माण सत् संकल्प

मी आस्तिकता आणि कर्तव्यनिष्ठता हे मानवी जीवनाचे धार्मिक कर्तव्य मानतो. शरीराला देवाचे मंदिर मानून मी आत्मसंयम आणि नियमिततेने माझ्या...

 
 
 

Comments


©2020 by DIYA (Youth wing of AWGP). 

bottom of page