top of page
Post: Blog2_Post
Search

आमचा युग - निर्माण सत् संकल्प


मी आस्तिकता आणि कर्तव्यनिष्ठता हे मानवी जीवनाचे धार्मिक कर्तव्य मानतो. शरीराला देवाचे मंदिर मानून मी आत्मसंयम आणि नियमिततेने माझ्या आरोग्याचे रक्षण करीन. मनाला जीवनाचा केंद्रबिंदू मानून ते मी नेहमी स्वच्छ ठेवीन. वाईट विचार आणि दुर्भवनांपासून दूर राहण्यासाठी मी स्वयंअध्ययन आणि सत्संगाची व्यवस्था ठेवीन. मी स्वतःला समाजाचा अविभाज्य घटक समजेन आणि सर्वांच्या हिताचा विचार करेन. मी सामूहिक स्वार्थ आणि सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हित आणि आनंदाला महत्त्व देणार नाही.

नागरिकत्व, नैतिकता, मानवता, सच्चरित्रता, शालीनता, औदार्य, जिव्हाळा, सहिष्णुता या सद्गुणांना खरी संपत्ती मानून मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात ते वाढवत राहीन. मी आध्यात्मिक साधना, स्वाध्याय, संयम आणि सेवेमध्ये आळस आणि प्रमाद होवू देणार नाही. मी सर्वत्र मधुरता, स्वच्छता, साधेपणा आणि सज्जनता यांचे वातावरण निर्माण करीन. परंपरेपेक्षा विवेकाला महत्त्व देईन. अनीतितून मिळालेल्या यशापेक्षा मी नीतीचे पालन करून अपयशाचा स्वीकार करेल. मी माणसाच्या मूल्यमापनाचा निकष त्याच्या यश, क्षमता आणि व्यक्तिमत्त्वावर नाही तर त्याचे चांगले विचार आणि चांगल्या कृतींवर ठेवीन.


माझे जीवन स्वार्थासाठी नाही तर परोपकारासाठी असेल. मी माझा वेळ, प्रभाव, ज्ञान, प्रयत्न आणि पैसा यांचा काही भाग जगात पुण्य पसरवण्यासाठी नियमितपणे देत राहीन. दुसऱ्यां सोबत मी तो व्यवहार करणार नाही जो मला स्वत: ला आवडत नाही. प्रामाणिकपणा आणि मेहनतीची कमाई मी स्वीकारेन. नारी जातीप्रती आई, बहीण आणि मुलीची दृष्टी ठेवेन. "मनुष्य आपल्या भाग्याचा निर्माता स्वतःच आहे". या विश्वासाच्या आधारावर माझी धारणा आहे की मी उत्कृष्ट बनेल आणि दुसऱ्यांना श्रेष्ठ बनवेल, तर युग नक्कीच बदलेल. आपला युग निर्माण संकल्प अवश्य पूर्ण होइल.


Akhandjyoti

1962 - September




 
 
 

Comments


©2020 by DIYA (Youth wing of AWGP). 

bottom of page