अमृतवाणी
- Akhand Jyoti Magazine
- Jul 14, 2021
- 1 min read
मनुष्य समाजात राहतो. कळत-नकळत समाजाकडून त्याला अनेक प्रकारच्या सोयी मिळू लागतात. सुखांची साधने मिळतात, सुविधा लाभतात. त्यांचा तो उपभोग घेतो. पण त्याच बरोबर त्याच्यावर समाजाची काही जबाबदारी 'सुद्धा येऊन पडते. समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्याकडून जास्तीत जास्त अनुदान त्याने द्यावे ही समाजाची अपेक्षा असते. सेवा करणे, लोकांच्या उन्नतीसाठी झटणे , होईल तेवढे आपल्या कडून प्रयत्न करणे हे त्याचे कर्तव्य ठरते. समाजाचे जे ऋण त्याच्यावर असते त्याची परत फेड त्याने अशा रीतीने करणे हे जरूरीचे आहे. आपल्या आयुष्यात ही दोन्ही प्रकारची कामे एकाच वेळी करायची असतात, समाजाचे
लेणे स्वीकारणे व त्याच्या ऋणाची परत फेड करणे, या जबाबदारी पासून जो व्यक्ती आपले तोंड फिरवितो तो एक प्रकारे समाजाचा अपराधी ठरतो, तो समाज द्रोही बनतो, कृतघ्न होतो, कर्तव्यच्युत ठरतो.
-पं श्रीराम शर्मा आचार्य
मे 2009
अखण्ड ज्योती (मराठी)
पृष्ठ 35
Comentarios